रंगाची उधळण सुरु झाली कि मला तुझी आठवण येते...
सप्त रंग उधळले जातात तेव्हा त्यात... मी माझा एक रंग शोधते... जो मला भावून जाईल
न जाणो किती दिवसापासून त्या रंगाची वाट पाहत आहे..
कधी तरी तो रंग तुझ्या हातात यावा.. असे सारखे वाटत राहते...
होळीचा सण आला कि आपसूकच या मनाची चलबिचल चालू होते... आणि एक अनामिक ओढ लागते .. त्या रंगाची अन तुझ्या येण्याची ही...
का कुणास ठावूक आज इतके दिवस झाले पण रंगापासून स्वतःला वंचितच ठेवले
अगदी वेडा बाईच आहे मी... जणू त्या रंगाने मला काहीतरी होणारच आहे.... छे मनाचे खेळ ते...कुणालाच रंग लावू द्याच नाही का पाणी उडवू द्याचे नाही....
लाल पिवळा हिरवा जांभळा विविध रंगी पाणी पाहायला मजा वाटते.
मग कधीतरी खिडकीत उभे राहून दुसऱ्याना खेळताना पाहण्यातच समाधान मानायचे...
प्रत्येक रंगांचे सौंदर्या हे आगळेच.. नेहमीच खुलून दिसणारे... स्वतःचे अस्तित्व थाटात सांभाळून ठेवणारे असेच काहीसे रंग आपल्या आयुष्यात नकळत येवून जातात... कधी खूप सुखावून तर कधी मनाला बोच लावून जातात असा एक रंग आहे .... जो मला तुझ्याकडून हवा आहे... तुझ्या स्पर्शातून तो मला हवा आहे..

जो अलगद माझ्या गालावरून ओघळेल आणि मनाला स्पर्श करून जाईल... मी त्या रंगाची आतुरतेने वाट पाहत आहे जणू काही चातक त्या ढगाळलेल्या आकाशाकडे टक लावून त्याची वाट पाहतो तसेच काही समज तो रंग कधीच माझ्या गालावरून उतरणार नाही तर.... तो दिवसेन दिवस त्याचे सौंदर्य खुलून येईल...तो रंग आहे प्रेमाचा.... कसा असेल हा रंग ... मला सुखावून जाईल... देशील ना हा रंग मला...... ????
No comments:
Post a Comment