पाउस.....
हा शब्द अगदी अलगद अशा कापसासारखा ....नव्वदीतल्या आजी आजोबाचे हि मन हलके करणारा हा पाउस... आणि आपल्या सर्वाना आपल्या लहानपणीचे दिवस, तारुण्याचे दिवस, मनात आणि डोळ्यासमोर चटकन उभा करणारा हा पाउस.. जरासा अल्लड, आल्हाददायक सोज्वळ असा हा पाउस किती कौतुक करू याचे.....
पाउस येण्या आधीचे वातावरण तर खूपच वेगळे असते.
लहान असताना पाउस आला कि आई गाणे म्हणायला शिकवायची "ये रे ये रे पावसा तुला देतो पैसा" अन खिडकी नाहीतर दारात उभी राहून त्या पावसाचे थेंब त्या नाजूक अश्या तळहातावर झेलायला सांगायची... मग आपण हि त्याचा स्पर्श झाला कि हसून आईच्या मिठीत जायचे नाहीतर त्याच इवल्याश्या ओंजळीत त्या प्रत्येक थेंबाला पकडण्याचा प्रयत्न करायचा.....
आपणाला शाळेत जाण्यासाठी आई कडेवर घेवून तिच्याच छत्रीत घेवून शाळेत सोडायची. जास्त पाउस आला कि शाळा लवकर सोडतात हे आपल्या बालमनाला कुठेतरी जाणवते आन मग आपण गाणे गुणगुणे चालू होते "सांग सांग भोलानाथ पाउस पडेल काय शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय ?"
मग जरा मोठे झालो कि आपणाला स्वतःची एक स्वत्रंत असा रेनकोट भेटतो .... कुठे तळे साचलेले दिसले कि त्यात जाऊन उद्या मारायच्या आणि पाणी उडवायचे गमबुटात कधी कधी पाणी जायचे तर कधी दप्तरातली पुस्तके भिजायची... ती पुस्तके घरी आल्यावर पंख्याखाली सुकायला ठेवायची....घरी आल्यावर आईला बोलायचे "ये आई मला पावसात जाऊ दे, पावसात भिजुनी मला चिंब चिंब होवू दे....." पण आई काळजीपोटी आपली समजूत काढायची "नको रे राजा सर्दी होईल तुला....
नंतर आपल्याला वेध लागतात ते छत्रीचे, अन ती भेटतेही कॉलेजमध्ये गेल्यावर.....पाउस जास्त आला कि घराचे छत गळायचे अन मग घरभर इथे तिथे भांडी ठेवायला आईला मदत करायची. कुठेतरी चहाच्या टपरीवर गरम भाजीचा आस्वाद घेत मित्राबरोबर गप्पा मारायच्या
No comments:
Post a Comment