आठवण येत आहे मला तुझी
तुला येत आहे का माझी ????
मन कावरे बावरे होते आहे, संध्याकाळ झाली कि हे मला असेच होते.. मनाची उगाचच चलबिचल चालू होते. ऑफिस मधून घरी येत असेल तर तुझेच विचार मनात तरंगत असतात. आणि जर घरी असले कि वाटते माझी कुठली तरी मौल्यवान गोष्ट हरवली आहे. मग खिडकीत बसून तुला आठवत बसण्यातच समाधान मानते. खिडकीतून सूर्यास्त पाहताना मन कातर होत असते अन विचार करते कि तू आज हि मला भेटला नाहीस कुठे असशील काय करत असशील ? मावळत्या सूर्यामुळे आकाशात विविध रंगी पडलेल्या छटा पाहत बसते. मग कुठेतरी मनाला वाटते कि आता तू जवळ हवा होतास हा क्षण माझ्यासोबत अनुभवण्यासाठी. बिल्डींगच्या खाली लहान मुलाच्या खेळण्याचे आवाज, रस्त्यावरील गाड्याचे वाजणारे होर्न या सर्व गोष्टीचा मला काहीही त्रास होत नव्हता. याचत मला एक अनामिक शांतता जाणवत होती. मग हळूच एका सप्तरंगी स्वप्नात रंगून गेले तू आणि फक्त मी... त्या खिडकी मध्ये बसून नाही जणू काही पैलतीरावर बसून समोरील आकाशाचे सौंदर्य नायाहाळत होते. हलकेश्या हवेसरशी केसांची एक बट गालाला स्पर्श करत होती, तिला तू हळूच बाजूला सरत त्या गालावर स्वतःचे बोटाने रांगोळी काढू लागला. हळूच माझा हात तुझ्या हातात घेत माझ्या बोटाशी खेळू लागलास. माझ्या कानात स्वतःच्या ओठांनी फुंकर घालून उगाचाच मला त्रास देत होतास... संध्याकाळच्या त्या मंद प्रकशात सूर्याचे हलकेसे पण मावळणाऱ्या किरणाचा प्रकाश माझ्या चेहर्यावर लाडीकपणे न्याहाळत होतास. मग मी तुझ्या खांद्यावर माझ्याही नकळतच हलकेसे डोके ठेवते. तू काहीतरी इशारा समजून घेतोस अन तोच हात माझ्या खांद्यावर ठेवून मला अजून जवळ घेतोस. माझ्या मनात भावनाची ढवळाढवळ चालू होते. अंगावर एक बोचरा पण सुखद शहारा येतो. ते तू जाणतोस अन गालातल्या गालात हसतोस. आपण दोघेही निशब्दपणे एकमेकांचा सहवास अनुभवत होतो. रममाण होवून गेलो होतो. अंधार वाढत चालला होता. बिल्डिंगच्या आडून सूर्य कधीच गेला होता. राहिला तो फक्त त्याचा पुसटसा प्रकाश आणि काळे पिवळे लाल असे रंगीत आकाश. थंड वारा सुटला होता. अन तू मला काहीतरी विचारणार इतक्यात कानावर आवाज येतो, अग साळू, उठ आता पाणी यायची वेळ झाली आहे मी जरा मार्केट मध्ये जावून येते असं बोलत आई दरवाजातून बाहेर जाते. मी भानावर येत स्वतःला सावरत इकडे तिकडे पाहते तिथे कोणीच नसते.....
मग मी उठून काम करू लागते... अधून मधून खिडकी कडे पाहायचे तर तिथे तू मिश्किलीने हसत माझ्याकडे पाहत होतास. आणि हळूच म्हणालास मी उद्या येईन माझ्या गालावर एक लाजेची कळी उमलली... आणि तू निघून गेलास.. मी मात्र संध्याकाळची वाट पाहत परत त्या खिडकी जवळ येऊन बसले.
No comments:
Post a Comment