Monday, January 31, 2011


पाउस.....
हा शब्द अगदी अलगद  अशा कापसासारखा ....नव्वदीतल्या आजी आजोबाचे हि मन हलके करणारा हा पाउस... आणि आपल्या सर्वाना आपल्या लहानपणीचे दिवस, तारुण्याचे दिवस, मनात आणि डोळ्यासमोर चटकन उभा करणारा हा पाउस.. जरासा अल्लड, आल्हाददायक सोज्वळ असा हा पाउस किती कौतुक करू याचे.....
पाउस येण्या आधीचे वातावरण तर खूपच वेगळे असते. 

लहान असताना पाउस आला कि आई गाणे म्हणायला शिकवायची "ये रे ये रे पावसा तुला देतो पैसा" अन खिडकी नाहीतर दारात उभी राहून त्या पावसाचे थेंब त्या नाजूक अश्या तळहातावर झेलायला सांगायची... मग आपण हि त्याचा स्पर्श झाला कि हसून आईच्या मिठीत जायचे नाहीतर त्याच इवल्याश्या ओंजळीत त्या प्रत्येक थेंबाला पकडण्याचा प्रयत्न करायचा.....
आपणाला शाळेत जाण्यासाठी आई कडेवर घेवून तिच्याच छत्रीत घेवून शाळेत सोडायची. जास्त  पाउस आला कि शाळा लवकर सोडतात हे आपल्या बालमनाला कुठेतरी जाणवते आन मग आपण गाणे गुणगुणे चालू होते "सांग सांग भोलानाथ पाउस पडेल काय शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय ?" 
मग जरा मोठे झालो कि आपणाला स्वतःची एक स्वत्रंत असा रेनकोट भेटतो ....  कुठे तळे साचलेले दिसले कि त्यात जाऊन उद्या मारायच्या आणि पाणी उडवायचे गमबुटात कधी कधी पाणी जायचे तर कधी दप्तरातली पुस्तके भिजायची... ती पुस्तके घरी आल्यावर पंख्याखाली सुकायला ठेवायची....घरी आल्यावर आईला बोलायचे "ये आई मला पावसात जाऊ दे, पावसात भिजुनी मला चिंब चिंब होवू दे....." पण आई काळजीपोटी आपली समजूत काढायची "नको रे राजा सर्दी होईल तुला....

नंतर आपल्याला वेध लागतात ते छत्रीचे, अन ती भेटतेही कॉलेजमध्ये गेल्यावर.....पाउस जास्त आला कि घराचे छत गळायचे अन मग घरभर इथे तिथे भांडी ठेवायला आईला मदत करायची. कुठेतरी चहाच्या टपरीवर गरम भाजीचा आस्वाद घेत मित्राबरोबर गप्पा मारायच्या 

Sunday, January 30, 2011

आठवण येत आहे मला तुझी

आठवण येत आहे मला तुझी
तुला येत आहे का माझी ???? 
मन कावरे बावरे होते आहे, संध्याकाळ झाली कि हे मला असेच होते.. मनाची उगाचच चलबिचल चालू होते. ऑफिस मधून घरी येत असेल तर तुझेच विचार मनात तरंगत असतात. आणि जर घरी असले कि वाटते माझी कुठली तरी मौल्यवान गोष्ट हरवली आहे. मग खिडकीत बसून तुला आठवत बसण्यातच समाधान मानते. खिडकीतून सूर्यास्त पाहताना मन कातर होत असते अन विचार करते कि तू आज हि मला भेटला नाहीस कुठे असशील काय करत असशील ? मावळत्या  सूर्यामुळे आकाशात विविध रंगी पडलेल्या  छटा पाहत बसते. मग कुठेतरी मनाला वाटते कि आता तू जवळ हवा होतास हा क्षण माझ्यासोबत अनुभवण्यासाठी. बिल्डींगच्या खाली  लहान मुलाच्या खेळण्याचे आवाज, रस्त्यावरील गाड्याचे वाजणारे होर्न या सर्व गोष्टीचा मला काहीही त्रास होत नव्हता. याचत मला एक अनामिक शांतता जाणवत होती. मग हळूच एका सप्तरंगी स्वप्नात रंगून गेले तू आणि फक्त मी... त्या खिडकी मध्ये बसून नाही जणू काही पैलतीरावर बसून समोरील आकाशाचे सौंदर्य नायाहाळत होते. हलकेश्या हवेसरशी केसांची एक बट गालाला स्पर्श करत होती, तिला तू हळूच बाजूला सरत त्या गालावर स्वतःचे बोटाने रांगोळी काढू लागला. हळूच माझा हात तुझ्या हातात घेत माझ्या बोटाशी खेळू लागलास. माझ्या कानात स्वतःच्या ओठांनी फुंकर घालून उगाचाच मला त्रास देत होतास... संध्याकाळच्या त्या मंद प्रकशात सूर्याचे हलकेसे पण मावळणाऱ्या किरणाचा प्रकाश माझ्या चेहर्यावर लाडीकपणे न्याहाळत होतास. मग मी तुझ्या खांद्यावर माझ्याही नकळतच हलकेसे डोके ठेवते. तू काहीतरी इशारा समजून घेतोस अन तोच हात माझ्या खांद्यावर ठेवून मला अजून जवळ घेतोस. माझ्या मनात भावनाची ढवळाढवळ चालू होते. अंगावर एक बोचरा पण सुखद शहारा येतो. ते तू जाणतोस अन गालातल्या गालात हसतोस. आपण दोघेही निशब्दपणे एकमेकांचा सहवास अनुभवत होतो. रममाण होवून गेलो होतो. अंधार वाढत चालला होता. बिल्डिंगच्या आडून सूर्य कधीच गेला होता. राहिला तो फक्त त्याचा पुसटसा प्रकाश आणि काळे पिवळे लाल असे रंगीत आकाश. थंड वारा सुटला होता. अन तू मला काहीतरी विचारणार इतक्यात कानावर आवाज येतो, अग साळू, उठ आता पाणी यायची वेळ झाली आहे मी जरा मार्केट मध्ये जावून येते असं बोलत आई दरवाजातून बाहेर जाते. मी भानावर येत स्वतःला सावरत इकडे तिकडे पाहते तिथे कोणीच नसते..... 
मग मी उठून काम करू लागते... अधून मधून खिडकी कडे पाहायचे तर तिथे तू मिश्किलीने हसत माझ्याकडे पाहत होतास. आणि हळूच म्हणालास मी उद्या येईन माझ्या गालावर एक लाजेची कळी उमलली... आणि तू निघून गेलास.. मी मात्र संध्याकाळची वाट पाहत परत त्या खिडकी जवळ येऊन बसले.

तुझा फोटो

 
 

तुझा फोटो



आज माझा दिवस फक्त तुझा फोटो पाहण्यातच गेला....
का कुणास ठाऊक .... एक अनाहत आनंदाची अनुभूती जाणवत होती
क्षण दोन क्षण न्याहाल्याचे.... काही तरी विचार करून हसायचे
तशी रस्त्यात मोबायील वर गाणे ऐकण्याच गुंगणारी मी
आज स्वतःच गाणे गाण्यात मग्न झालेली
प्रत्येक क्षणाला तुला पाहताना मनात आपसूक भीती दाटून यायची
क्षणातील हि प्रतिक्षण नजर भेट व्हावी ......
दिवस सरत चालला होता.... हुरहूर वाढत चालेली भावना दाटून येत होत्या
तुझे हि असेच होत असेल का ? तुलाही माझी आठवण येत असेल का ?
एकापाठोपाठ प्रश्नाची रांग लागली.... मन त्याची उत्तरे शोधू लागले
प्रेमाच्या आणाभाका घेवू लागले.. स्वप्नात रंगू लागले ...
शब्द जुळत नव्हते.... मन वळत नव्हते..... काय होत आहे हे हि कळत नव्हते
संध्याकाळी हृदय कातर होवू लागले... वातावरण भकास वाटू लागले....
मन विचित्र भीतीने गहिवरून आले ....
भरून आले.. डोळ्याच्या कडा ओलावून मन वाहू लागले..
बैचेन होवू लागले काय होईल पुढे याचा विचार करू लागले...
थोडा वेळ नेहमीच्या विश्वात जाऊन वावरून आले
थोडासा धीर धरला... खभीर झाले...
विचार केला... नशिबातले कोणी हिरावू शकत नाही अन चोरुही शकत नाही.....
दैवावर हवाला सोडून परत तुझ्या स्वप्नात... तुझ्या विश्वात रमू लागले...

ती सकाळ कि संध्याकाळ

ती सकाळ कि संध्याकाळ

डोळ्यावर हलकीशी झोप होती, ताजेपनाही जाणवत होता एखाद्या रोपला नविन पालवीफुटावी तसेच काहीसे वाटत होते खरे म्हणजे parlour मध्ये जावून आले होते मस्त पैकीचेहर्याला मसाज झाले होते अर्धवट झोप झाली होती परन्तु पूर्ण झोप घेतल्याचे समाधाननक्कीच जाणवत होते मधून बाहेंर आले आणि बाहेरचे वातावरण वेगळेच जाणवत होतेका कुणास ठावुक परन्तु तुझी आठवण प्रकर्षाने येत होती... हलकासा पाउस येवूनगेल्याचे दिसत होते रस्ते अर्धवट ओले झाले होते क्षणभर सकाळ आहे की संध्याकाळआहे याचा मला सम्भ्रम पडला होता. कोणालाही असेच वाटले असते. रस्त्यावर गाड्याचीवर्दळ पाहून वाटले की संध्याकाळ असेल, मुसलधार पाऊस पडून गेल्यावर धरतीचेसौन्दर्य जसे खुलुन दिसते तसेच माझ्या चेहर्यावर काहीसे तेज असावे असे जाणवत होते.आकाश निर्भर दिसत होते.
मनाला अतिशय प्रसन्न वाटत होते..... त्यात तुझा दुरावा तुझी ओढ़ तुझा विरह मलाजाणवत होता पाण्याचे हलकेसे थेंब झाडावर दिसत होते हात लावला तर त्याचे थेबचटकन माझ्या बोटावर पडले तुझ्या स्पर्शाचा भास मला प्रकर्षाने जाणवला.

बिल्डिंगच्या खाली असताना खिडकीतली मिणामिणारी पणती दिसली जणू माझ्यासारखीच.... तिच्या जोडीला दिवाहि असावा असेच काहीसे तिला वाटत होते.....
जसे माझ्या जोडीला तू असावास