नात्याची गुंफण घे तू सांभाळून
अलगद पावलांनी येई तुझ्या जीवनी
उधळ हे क्षण त्याच्या समवेत
आठवणी या अनमोल घे तू कवेत
Monday, April 8, 2019
तो म्हणाला,
आयुष्य नव्याने सुरु करूया
मी म्हंटल मला थोडा वेळ हवा आहे
पण काहीच दिवसात कळले
याचा जीव माझ्यावर जडला आहे
अन मग काय.. मनात किंतु न ठेवता
तुला आयुष्यात प्रवेश दिला आहे